आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजेंना गाभाऱ्यात जाण्यास रोखले:तुळजापूर आज कडकडीत बंद; तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी

​​​​​​​तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. १२) तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे. याप्रकरणी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार व धार्मिक व्यवस्थापकांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली.

संभाजीराजेंच्या दर्शनावेळी झालेल्या गैरसोयीबद्दल मंदिर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली आहे. संभाजीराजेंना सोमवारी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतेवेळी मंदिर संस्थानने देऊळ कवायतच्या नियमाचा दाखला देत गर्भगृहात जाण्यापासून रोखले होते. या प्रकारानंतर संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानच्या अध्यक्षांना फोन करून जाब विचारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाच तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गर्भगृहात जाण्यापासून रोखल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिवप्रेमींनी याविरोधात समाज माध्यमावर जोरदार निषेध व्यक्त केला. गुरुवारी तुळजापूर बंदची हाक देण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संभाजीराजेंची आज पुण्यात नव्या पक्षाची घोषणा ?

खासदारकीची मुदत संपत येत असल्याने संभाजीराजे यांनी नवीन राजकीय रणनिती तयार करण्याचे संकेत दिले असून गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ते त्यांची आगामी भूमिका स्पष्ट करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...