आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या:गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गांजाची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना कोल्हापूराच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या. रमेश दादासाहेब शिंदे (४४, रा. विक्रमनगर, कोल्हापूर) आणि समाधान मारुती यादव (२९, रा. घाटंग्री, जि.उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयिताकडून ३ लाख ७२ हजार रुपये किमतीचा ३१ किलो १३० ग्रॅम गांजा आणि कार असा एकूण ९ लाख ८७ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनुसार, संशयित रमेश व समाधान गांजा तस्करी करत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. आठवड्यापासून त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखा लक्ष्य ठेवून होते. गुरुवारी राजाराम तलाव परिसरात संबंधित तस्कर ग्राहकाच्या प्रतीक्षेत असताना सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले.