आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू:म्हैस धुण्यासाठी गेलेला तरूण बुडाला, अंघोळीसाठी गेलेल्या वृद्धाचा पाय घसरला

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यातील अवसरी गावातील 22 वर्षाच्या तरुणाचा म्हैस धुवायला गेल्यानंतर तलावात बुडून मृत्यू झाला, तर क्षेत्र माहुली (सातारा) येथील 80 वर्षाचा वृद्ध अंघोळीला गेल्यानंतर पाय घसरून कृष्णा नदीच्या पात्रात बुडाला. दत्ता रघुनाथ शिर्के आणि दिनकर रामचंद्र पवार अशी मृतांची नावे आहेत.

अवसरी (ता. पाटण) गावातील दत्ता रघुनाथ शिर्के हा 22 वर्षांचा तरुण शनिवारी (दि. 3) म्हैस धुवायला तलावात गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला. स्थानिकांनी दोन दिवस त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड रेस्क्यु टीमला पाचारण करण्यात आले. या टीमच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने शोध घेत सात तासानंतर मृतदेह शोधून बाहेर काढला.

80 वर्षांच्या वृद्धाचाही मृत्यू

सुनील भाटिया, अमित कोळी, जयवंत बिरामणे, अनिकेत वागदरे, अजित जाधव, आशिष बिरामणे, तेजस जवळ, अभिषेक भिलारे यांनी ही शोध मोहिम राबविली. याबरोबरच क्षेत्रमाहुली (ता. सातारा) येथे 80 वर्षाचा वृद्ध पाय घसरून कृष्णा नदीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दिनकर रामचंद्र पवार असे मृत वृद्धाचे नाव आहे.

कृष्णेच्या काठावर अंघोळीस गेले होते

या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कृष्णा नदी काठावर अंघोळ करण्यासाठी गेले असता अचानक ते पाय घसरून पाण्यात पडले. आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत यशवंत शंकर पवार यांनी सातारा शहर पोलिसांना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...