आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतापगडाच्या पायथ्याला आणखी दोन कबरी सापडल्या:अफजलखान कबरीच्या शेजारीच कबरी असल्याने इतिहास संशोधकांना आव्हान

सातारा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीजवळ आणखी दोन कबरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन कबरी आढळल्याच्या वृत्ताला सातारा जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला असून प्रशासन आता त्या कबरींची माहिती घेत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी पुर्वी केवळ अफजलखान आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा यांच्याच कबरी होत्या. मात्र, अतिक्रमणे काढल्यानंतर त्यांच्या कबरीशेजारी आणखी दोन कबरी आढळून आल्याने प्रशासन हडबडून गेले आहे. दरम्यान आता इतिहास संशोधकांपुढे हे आव्हान उभं राहिलं आहे.

अतिक्रमणे हटविल्यानंतर अफजलखान कबरीचा परिसर पूर्णपणे मोकळा झाला आहे. त्यामुळे अफजलखान आणि सय्यद बंडा यांच्या कबरींशेजारी अजून दोन कबरी असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सातारा जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोन कबरींपैकी एक कबर अफजलखान आणि सय्यद बंडा यांच्या कबरीशेजारी आहे, तर दुसरी कबर अतिक्रमण काढण्यात आलेल्या जागेत आहे. प्रशासनाने या कबरींबद्दलची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे.

अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती. तसेच कबरीला मशिदीचे स्वरूप देऊन त्याठिकाणी अनाधिकृत खोल्या बांधण्यात आल्या होत्या. काही फूट जागेत असणार्‍या कबरींशेजारी अतिक्रमण करत वन विभागाची मोठी जागा व्यापली होती. अफजलखानाच्या कबरीच्या उदात्तीकरणाविरोधात हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमी सातत्याने आंदोलन करत होते. तसेच कबरीशेजारील अतिक्रमणाचा वाद 1990 पासून सुरु होता. न्यायालयाने कबरीच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करत जिल्हा प्रशासनाने 15 ते 20 गुठ्यांच्या परिसरात करण्यात आलेली अतिक्रमणे हटवली.

अफजलखान कबरीच्या परिसरात आढळलेल्या दोन कबरींमुळे आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होऊन वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अतिक्रमण करणार्‍यांनी मूळ कबरींच्या शेजारीच आणखी दोन कबरी उभारल्याचे चित्र समोर आले आहे. या दोन कबरींपैकी एक कबर सेवेकर्‍याची असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसर्‍या कबरीबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या कबरी आढळल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासनाने दोन्ही कबरींची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान इतिहास संशोधकांना सुद्धा हे आव्हान असल्याचे बोलले जाते आहे

बातम्या आणखी आहेत...