आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गौप्यस्फोट:राज्य मंत्रिमंडळातील अजून दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला, आता मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण व पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेवरुन राज्य मंत्रिमंडळातील आनखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला.

'पोलिस अधिकारी सचिन वाजे प्रकरणाची मूळं लांबपर्यंत गेली असून सरकार तुमचं असतानाही खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण दाबले जाते असा आरोप नाना पटोले कसं काय करत आहेत, असा प्रतिसवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

अशोक चव्हाणांनकडून मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाचा अवमान

चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरूनही राज्य सरकारवर चौफेर टीका केली. अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाचा अवमान करीत असल्याचा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टात लवकर निर्णय लागावा यासाठी सरकारकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. एमपीएससी परीक्षा आणि नोकर भरती लांबणीवर पडल्यामुळे त्याचा मराठा समाजावर परिणाम होत असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला विश्वासात घेऊन भरती सुरू करू असे समजावून सांगितले पाहिजे, असा सल्लाही राज्य सरकारला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.दुसरीकडे, साष्ट पिंपळगावमध्ये सुरू असणारं मराठा आंदोलन चिरडण्याचा निषेध करत जर आंदोलन जबरदस्तीने संपवायचा प्रयत्न झाला तर ते आणखी मोठे आंदोलन होईल असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

असे राज्यकर्ते पाहिले नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांवर दररोज टीका करणारे असे राज्यकर्ते पाहिले नसल्याचा पलटवार केला आहे. पवार यांनी इतिहासात असे राज्यपाल पाहिले नाही असं वक्तव्य केलं होतं, त्याला पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सीमाप्रश्नाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकारने याबाबत पुढाकार घेतला पाहिजे आणि सीमाप्रश्न सुटण्यासाठी जे जे प्रयत्न करायला हवेत ते एकत्रितपणे करायला हवेत.

बातम्या आणखी आहेत...