आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलर्ट:सातारा जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू; मास्क वापरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा दिवसात तब्बल 52 रुग्णांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा आज मृत्यू झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात चिंता वाढली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. दरम्यान, सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करण्याचे आवाहन सातारचे जिल्हाधिकाऱी रुचेश ज्यांनी यांनी केले आहे.

इन्फ्लुएन्झा आणि कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला आहे.

आठवडी बाजार, एसटी स्टॅंड, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, तसेच मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात, अशा ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले आहे. जिल्ह्यातील दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ४५ रुग्ण कोरोना बाधित आहेत. त्यापैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. तसेच गृह विलगीकरणात असलेले सहा जण कोरोना मुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात बारा जणांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. त्यात तीन जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.