आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवेंद्रराजे भाेसल म्‍हणाले:उदयनराजेंनी दिल्लीमध्ये आंदोलन करावे

सातारा ​​​​​​​2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत काढलेल्या उद्गाराचा आम्ही निषेध केला आहे. त्यांना हटवण्याची मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. परंतु या पाठीमागे त्यांचा काही राजकीय स्वार्थ आहे का हेही पाहिले पाहिजे. राज्यपाल हटावची मागणी महाराष्ट्रात न करता त्याचा निर्णय दिल्लीत असल्याने तिथे जाऊन मागणी करावी, असा टोला भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांचे चुलत बंधू खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला आहे. मी कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध केलेला आहे. आमचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी यासंदर्भात लक्ष घालतो, असे सांगितल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...