आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल सन्मानाचं पद:बोलण्यापूर्वी अक्कल पाहिजे; सुधांशू त्रिवेदी थर्ड क्लास भिकारडा, दिसेल तिथे चोपून काढा- उदयनराजे

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल हे सन्मानाच पद आहे. त्यामुळे बोलण्यापूर्वी अक्कल वापरली पाहिजे. सुधांशू त्रिवेदी हे कुठलं भिकारडं, टुकारडं. त्याला तर दिसेल तिथे चोपून काढला पाहिजे, अशा शब्दात उदयनराजेंनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यपाल व सुधांशू त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यपालांना कळल पाहिजे

उदयनराजे म्हणाले, राज्यात कोणताही पक्ष असू दे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मात्र, आज महाराष्ट्रात चाललंय काय? राज्यपाल हे सन्मानाचे पद आहे. त्यामुळे बोलण्यापूर्वी अक्कल वापरली पाहीजे. आपण काय बोलतोय, हे कळलं पाहीजे. राज्यपालांनी एकदा नव्हे तर दोनदा शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

गँगरीनप्रमाणे कापून काढा

उदयनराजे म्हणाले, सुधांशू त्रिवेदी तर थर्ड क्लास भिकारड आहे. माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की, राज्यपाल आणि त्रिवेदीला तातडीने माफी मागायला लावा. त्रिवेदीची भाजपमधून हकालपट्टी करा. भगितसिंह कोश्यारींना पहिले राज्यपाल पदावरून खालील ओढून कुठे तरी लांब फेकून द्या. शरीराच्या एखाद्या अवयवाल जेव्हा गँगरीन होतो, तेव्हा तो अवयव कापून टाकावा लागतो. भाजपनेही अशा लोकांना पक्षातून कापून फेकून दिले पाहीजे.

लायकी आहे का?

उदयनराजे म्हणाले, सुधांशु त्रिवेदीची छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायची लायकी आहे का? शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले नसते तर आज त्यालाही गुलामगिरीत रहावे लागले असते. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असेस म्हणाणाऱ्याला चपलीनेच चोपून काढल पाहीजे.

...तर मी पाहतो

उदयनराजे म्हणाले, शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यामागे एक प्रकारची विकृती आहे. विकृती कोणत्याही पक्षाची किंवा जातीची नसते. त्यामुळे अशा विकृतीला जनतेनेच ठेचून काढले पाहीजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच महाराष्ट्राला एक ठेवू शकतो. त्यामुळे राज्यपाल व सुधांशू त्रिवेदीवर भाजपने काही कारवाई केली नाही, तर त्यांचे काय करायचे, हे मी पाहतो, असा इशाराही उदयनराजेंनी दिला.

बातम्या आणखी आहेत...