आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवरायांची बदनामी करण्याची विकृती दिवसेंदिवस वाढते आहे. वेगवेगळ्या मार्गांनी शिवरायांची बदनामी सुरूय. जग एवढ्या वेगाने पुढे चाललेय की, फारसा विचार करायचे लोकांनी बंद केलंय. प्रत्येकाचे जीवन एवढे हिकटीक झालेय, अशी खंत गुरुवारी उदयनराजे भोसले यांनी व्यक्ती केली. ते साताऱ्यात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराराजांनी त्या सर्वधर्मसमभावाचा विचार दिला. मात्र, आज बारकाईने बघितले, तर तो विचार अस्तित्वात राहिला आहे का, अशी परिस्थितीय. जाती - जातीत वैयक्तिक स्वार्थापोटी तेढ निर्माण केली जातेय. कारण नसताना भेदभाव निर्माण केला जातोय, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
शिवरायांनी लोकशाही संकल्पना मांडली
उदयनराजे पुढे म्हणाले की, पूर्वी पंजाब, सिंध, बंगाल एकीकडे, अफगाणिस्तान एकीकडे...मग शिल्लक राहिले तरी काय. त्या वेळेसच्या राज्यकर्त्यांनी वैयक्तिक स्वार्थ्य बघितला. लोकशाहीतल्या राजांनी केले तर काय, असा सवाल करून ते पुढे म्हणाले, आपण सगळे इस्लामिक देश पाहिले, तर तिथे राजेशाहीय. शिवाजी महाराजांना वाटले, असते तर अजून राजेशाही असती. मात्र, शिवरायांना वाटले लोकांचा सहभाग राजकारणात असावा. त्यामुळे त्यांनी लोकशाहीची संकल्पना मांडली. मात्र, नंतर घराणेशाही आली.
सत्तेचे केंद्रीकरण सुरूय
अनेक वर्ष त्याच - त्याच घराण्यातल्या लोकांनी याच लोकांना ज्ञान आहे आणि बाकीचे अज्ञानी आहेत, असा विचार रुजवला गेला. गांधीजींनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली. जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही. सामान्यांच्या हाती सत्ता दिली जात नाही. तोपर्यंत लोकशाही नांदणार नाही, असे सांगितले. मात्र, आज सगळं उलटं पाहायला मिळतंय. घराणेशाहीमुळे विकेंद्रीकरण तर लांब राहिले, पण सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचे ते म्हणाले.
...तर देशाचे 29 तुकडे
आज स्वतःला सावरले नाही, तर देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, कोकण, खान्देश, प. महाराष्ट्र होतील. शिवरायांच्या विचारांचा सर्वांना विसर पडलाय. त्यामुळे आजची ही परिस्थिती पाहायला मिळतेय. या परिस्थितीचा विचार मनात आला, तर दुःख वाटतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
...तर लोकशाहीची वाताहत
उदयनराजे पुढे म्हणाले की, या देशाला महासत्तेकडे न्यायचे, असे प्रत्येक जण बोलतात. शिवरायांचा विचार नसता, तर देश अखंड राहिला असता का? या लोकशाहीचे महातुकडे व्हायला किती वेळ लागेल. वाताहत होऊन जाईल. त्याची लोकांना आठवण करून द्यायची गरजय. या संपूर्ण राजकारण्यांनी हळूहळू करता - करता सोयीप्रमाणे सर्वधर्मसमभावाची व्याख्या बदलून टाकल्याचेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.