आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार अपयशी व असंवेदनशील असून सरकारमधील तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या विसंवादामुळे “गोंधळलेले महाविकास आघाडी सरकार’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात शुक्रवारी केली. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त ते बोलत होते. या सरकारचा भाजपला काही फरक पडत नाही. आमचे विधानसभेत १०५ आमदार आहेत. खासदार आहेत. केंद्रात सरकार आहे. सर्वसामान्य माणसाचे मात्र या सरकारमुळे प्रचंड नुकसान होत आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरेंबद्दल आकस नाही, मात्र महाराष्ट्राचे प्रश्न कोणते? प्रश्नांचे अनेक प्रकार आहेत. उद्धव ठाकरे यांना या प्रश्नांचा अभ्यास नाही. शरद पवारांनी अचानक त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. उद्धवजींना मंत्रालय कुठे आहे हेही माहीत नव्हते. कामकाज कसे होते हे माहीत नाही. देवेंद्र फडणवीस ५ वेळा आमदार, त्याआधी नगरसेवक होते. त्यांना अनुभव होता. मी पहिल्यांदा मंत्री झालो. मी रात्री ३ वाजेपर्यंत अभ्यास केला. नरेंद्र मोदीही अचानक मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांनी अभ्यास केला. उद्धव ठाकरे यांनीही आपला अभ्यास वाढवायला हवा. मी अनेकदा विरोधी पक्षाचा नेता म्हणून प्रश्न विचारले. त्याची उत्तरे त्यांनी मला अनेकदा दिली नाहीत. सर्वसामान्य माणसाला जाणून घ्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
आमच्या कुणाच्या चौकशा लावायच्या असतील तर त्या खुशाल लावू शकता. त्यांना घटनाच मान्य नाही असे दिसत आहे. सुप्रीम कोर्टाचाही निर्णय त्यांना मान्य नसतो. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, तो चांगला आणि अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय दिला तर तो चुकीचा, असे कसे चालेल, असेही ते म्हणाले.
...तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याचे नेतृत्व करण्याची वेळ येईल त्या वेळी शरद पवार सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करतील, असे माझे विश्लेषण आहे. ते चुकीचे नाही. त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावे वाटणे हे चूक नाही, असेही ते म्हणाले. या वेळी ८० तासांच्या सरकारआधी बैठकीत काय घडले होते यावर बोलणे चंद्रकांत पाटील यांनी टाळले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.