आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमके मुख्यमंत्री कोण?:‘पशुसंवर्धन’च्या फिरत्या दवाखान्यावर अजूनही उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री !

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लंपीचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचा फिरता दवाखाना गावोगावी जाऊन जनावरांची तपासणी, औषधोपचार करीत आहे. परंतु, फिरत्या दवाखान्यावर मुख्यमंत्री म्हणून अजूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीच छबी दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला नेमके मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात सहा महिन्यांपूर्वी मोठी उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. मात्र अनेक सरकारी योजनांच्या जाहिराती, फलक, वाहनांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचीच छबी पाहायला मिळत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या फिरत्या दवाखान्याच्या व्हॅनवर उद्धव ठाकरेंची छबी अजूनही तशीच आहे. या फिरत्या दवाखान्यामार्फत ग्रामीण भागात जनावरांची तपासणी करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...