आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिबाचे दर्शन:कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे संबंधकेंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मत, महालक्ष्मी, ज्योतिबाचे घेतले दर्शन

कोल्हापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूरच्या मातीशी आमच्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी कोल्हापुरात सांगितले. कोल्हापूर दौऱ्यावर त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) आणि श्री क्षेत्र ज्योतिबाचे दर्शन घेतले. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, श्रीक्षेत्र जोतिबा आमचे कुलस्वामी दैवत आहे. आज जोतिबा आणि आई अंबाबाईचे दर्शन घेण्याचा योग आला. हे माझं भाग्य समजतो. तसेच त्यांनी छत्रपती शिवराय संभाजी महाराज आणि माधवराव सिंधिया यांच्या विचारधारेवर काम करत असून यापुढे देखील जनसेवा करणार असल्याचेही ते या वेळी म्हटले. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...