आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेचीच ईडी चौकशी:मतदारांनो, ऑनलाइन पैसे घ्याल तर ईडी मागे लावू, कोल्हापुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे राज्यातील अनेक नेत्यांवरील ईडी कारवाईवरून सातत्याने राजकारण तापलेले पाहायला मिळत असतानाच आता चंद्रकांत पाटील यांनी सामान्य जनतेलाच ईडी चौकशीला समोर जावे लागेल, असा इशारा दिला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत ऑनलाइन पैसे वाटले जातील आणि ते जे कोणी घेतील त्यांना ईडी चौकशीला सामोरे जावे लागेल. आपल्याकडे पैसे आले तर कुठून आले? कोणी दिले आणि देणाऱ्यांनी कुठून गोळा केले याबाबत सविस्तर चौकशी केली जाईल. त्यामुळे आम्ही पक्क्या माहितीनुसार याबाबत ईडीला पत्र देणार असून, मतदारांनो सावध व्हा अन्यथा चौकशी अटळ असल्याचेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही ही निवडणूक केवळ विकासाच्या दिशेने घेऊन जात आहोत. मात्र, महाविकास आघाडीचे नेते हे सर्व वैयक्तिक पातळीवर घेऊन जात आहेत. दोन दिवसांपूर्वी मी बोललो होतो, एका शिक्षण संस्थेची मुलं घरोघरी जाऊन एक फॉर्म भरून घेत आहेत. त्यामध्ये लोकांची सर्व माहिती घेतली जात आहे. त्यामध्ये नाव, फोन नंबर, बँक नंबर आदी माहिती घेतली जात आहे. पण त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे. मात्र, मला पक्की माहिती मिळाली असून, मतदारांना ऑनलाइनद्वारे पैसे पाठवण्याची पूर्वतयारी आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध व्हावे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तपाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आम्ही ईडीलाही पत्र देणार
जर आपल्या अकाउंटवर असे पैसे आले तर आपल्याला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. हे पैसे कुठून आले, कोणी पाठवले सर्व चौकशी केली जाऊ शकते. त्याबाबत आम्ही आजच ईडीला पत्र देत असून फार मोठ्या रकमेने लोकांच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर होणार आहेत, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे. शिवाय १ हजारांच्या मोहापाई मतदारांनो आपल्या मागे शुक्लकाष्ठ लावून घेऊ नका, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...