आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • We Will Agitate In Front Of Karnataka Chief Minister's Residence Under The Leadership Of Chandrakant Patil On The Issue Of Almatti Dam Height; Hasan Mushrif

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:अलमट्टी धरण उंची प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करू;ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला

कोल्हापूर5 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • कोल्हापूरची हानी होणार नाही याची जबाबदारी केंद्र सरकारची-चंद्रकांत पाटील

कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला दरवर्षी पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होतो. पुन्हा या धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्याचा विचार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी जाहीर केले आहे. परंतू त्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्हा पूर्णपणे अलमट्टी धरणाच्या बॅक वाॅटरमध्ये बुडणार आहेत. त्याला कोल्हापूरकरासह संपूर्ण महाराष्ट्राचा विरोध आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे जाहीर केले आहे. अलमट्टी धरण उंची प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करू, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांचे स्वागतच करतो. फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला सांगून कोल्हापूर सांगली जिल्ह्यासाठी धोकादायक असलेल्या अलमट्टी धरणाची उंची वाढू देऊ नये आणि बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रतिष्ठापना तात्काळ करावी यासाठी कर्नाटक सरकारला सांगावे, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले. फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे गेले पाच-सहा महिने बिळात लपून बसलेले भाजपचे पदाधिकारी या निमित्ताने बाहेर पडतील. कोरोना महामारीत आम्ही करत असलेले चांगले काम त्यांच्या निदर्शनास येईल अशी टीकाही त्यांनी भाजप पदाधिकारी व चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. दरम्यान भाजप व एम आय एम यांनी मंदिर व मशिद खुली करा अशी मागणी करत आहेत. त्यामुळे भाजप व एम आय एम हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत असा आरोपही मंत्री मुश्रीफ यांनी केला. कोरोना पार्श्र्वभूमीवर बंद असलेली धार्मिक स्थळे निश्र्चितच उघडली जातील पण कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे याचे गांभिर्यही ठेवले पाहिजे असे मुश्रीफ यांनी सांगितले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील

कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची वाढवून पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय होणार असेल, तर केंद्रीय नेत्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल. वेळप्रसंगी जनतेच्या हितासाठी रस्त्यावरचे आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

कोल्हापूरची हानी होणार नाही याची जबाबदारी केंद्र सरकारची

कोल्हापूर जिल्हयातील शेती, वित्त आणि जीवीत मालमत्ता यांची हानी होणार नाही, याची काळजी घेणे हेही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. मुळात अलमट्टी धरणाबद्दलच्या काही बाबी न्यायप्रविष्ठ आहेत. हा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांशी संबंधीत विषय आहे. त्यामुळे पंतप्रधान किंवा केंद्र सरकार घाईगडबडीने किंवा एकांगी निर्णय घेणार नाही. तथापि कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भुमिका कायम ठेवली, तर त्यांनाही पश्‍चिम महाराष्ट्रावर होणार्‍या अन्यायाची कल्पना देवू. तसेच केंद्र स्तरावरही धरणाची उंची वाढल्यानंतर निर्माण होणार्‍या परिणामांची जाणीव करून देवू आणि सर्वसमावेशक आणि व्यापक हिताचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser