आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:आरक्षणासंबंधी सर्व विषय पूर्ण केल्याशिवाय शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, ही ग्वाही देतो-हसन मुश्रीफ

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे'

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात आज म्हणजेच 16 जूनपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी पहिले आंदोलन होत आहे. दरम्यान, कोल्हापुरात आज जोरदार पाऊस कोसळत आहे. पण, भर पावसात हा मराठा मोर्चा निघत आहे. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, सर्वात आधी मराठा आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आघाडी सरकारने दिले होते. त्यावेळी नारायण राणे समिती नेमून मराठा आरक्षण देण्यात आले. पण, आमच्याकडून जी चूक झाली होती, तीच चूक भाजप सरकारकडूनही झाली आणि आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिल्यामुळे हायकोर्टाने आरक्षण नाकारले. ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांची ही पुण्यभूमी आहे. जगाला समतेचा संदेश शाहू महाराजांनी दिला. रयतेसाठी खजिना रिता करणारे शाहू महाराज होते, असे ते म्हणाले.

भाजपने राजकारण करू नये
हसन मुश्रीफ यांनी यावेळी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपला हात जोडून विनंती आहे, राजकारण करु नका. मराठा आरक्षण टिकले नाही म्हणता, पण कायदा नीट केला असता तर टिकला असता, त्यामुळे आता एकमेकांच्या चुकांकडे लक्ष न वेधता, मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करू. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. सर्व विषय पूर्ण केल्याशिवाय शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, ही ग्वाही मी देतो. मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्या, हे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...