आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:दहावी, बारावी परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेऊ : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

कोल्हापूर | प्रिया सरीकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'माझे शिक्षण माझे भविष्य' ही शिक्षण क्षेत्रातील नवीन टॅगलाईन

दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होतात. यंदा मात्र कोरोनामुळे या परीक्षा कधी होणार? अभ्यासक्रम किती असणार? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या सतावत आहेत. या सर्वांना दिलासा देत १० वी आणि १२वी च्या परीक्षेबाबत लवकरच योग्य निर्णय घेऊ, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता....

इयत्ता ९ ते १२ वी वर्ग सुरू करताना जी काळजी घेतली तिच काळजी परीक्षेच्या वेळी घेतली जाणार. दहा दिवसात सगळी तयारी करण्यात येणार आहे. १५ ते १६ लाख विद्यार्थी सध्या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहेत. मात्र, कुणाला कोरोना लागण झाली नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. २०२५ पर्यंत शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय शाळेत इंटरनेट पोहचवलं जाईल. माझे शिक्षण माझं भविष्य, ही शिक्षण क्षेत्रातील नवीन टॅगलाईन असल्याचेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...