आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चा:अशक्तपणा, हाताला सलाईनची सुई, तरीही शिवसेना खासदार धैर्यशील माने मोर्चात सहभागी

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन-माने

आज कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी मोर्चा निघाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाला कोल्हापुरातील सर्व आमदार-खासदारांनी पाठिंबा दिला आहे. हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील मानेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, माने यावेळी सलाईन लावून आलेले दिसले.

खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अशक्तपणा असल्याने ते घरात उपचार घेत होते. पण, मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रकृती नाजूक असतानाही सलाईन लावून सहभागी झाले. माने स्वतःची पर्वा न करता मोर्चात सहभागी झाले.

आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन-माने
यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की, महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतले आहे. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होईल. आरक्षण कोणामुळे थांबले, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावे आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावे. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असे शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...