आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गणेशोत्सव:हजारो तयार गणेशमूर्तींचे करायचे काय...? गणेश मूर्तीकारांपुढे प्रश्न; मूर्तीकार आर्थिक संकटात सापडणार

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • तयार मूर्ती बसवण्यास परवानगी द्यावी : कुंभार समाज

गतवर्षी महापूर आणि यावर्षी  करोना विषाणूचे संकट यामुळे कोल्हापूरचे मूर्तीकार अक्षरश: खचून गेले आहेत. गणेशोत्सवाला महिन्याचा कालावधी बाकी असताना राज्य सरकारने केवळ चार फुट उंचीच्या गणेशमूर्ती बसवण्याची अट घातल्याने हजारोंच्या संख्येने तयार मूर्ती करायच्या काय असा प्रश्र्न मूर्तीकारांपुढे उभा आहे. कोल्हापूरातून परगावी जाण्यास तयार असलेल्या आणि स्थानिक मंडळांसाठी साकारलेल्या जवळपास २० ते पंचवीस हजार मूर्ती चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या आहेत.

कोरोनाचे भयान सावट सार्वजनिक गणेशोत्सव वर गडदपणे दिसू लागले आहे. उत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्या आहेत. अनेक मंडळांनी राज्य शासनाने घातलेल्या अटींमुळे मोठ्या मूर्ती रद्द करुन त्याऐवजी चार फुट उंचीच्या मूर्तींची मागणी मूर्तीकारांकडे केली आहे. परिणामी मूर्तीकार आर्थिक संकटात सापडले आहेत. याशिवाय जानेवारी पासून साकारलेल्या हजारोंच्या संख्येने तयार मूर्ती ठेवायच्या कुठे, त्यांचे करायचे काय? हे संकट त्यांच्यावर ओढावले आहे.

कोल्हापूरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानुसार  गेल्या सात महिन्यात येथील मूर्तीकारांनी  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ५  फुटापासून १६ फुटापर्यंत तब्बल  वीस ते पंचवीस हजाराच्या आसपास गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. कालावधीत नेहमीप्रमाणे कारागीर मूर्ती बनवून ठेवल्या. 

सर्व मूर्तीकारांनी बँक, पतसंस्था किंवा अन्य आर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून हंगामी कर्ज घेतले आहे. मूर्तीची विक्री न झाल्यास त्यांच्यासमोर कर्जपरतफेडीचा प्रश्न निर्माण होणार आहे.. त्यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता अधिकच वाढली आहे.

मूर्तीकारांची सरकारला विनंती

अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणेश मूर्ती तयार आहेत. साधारण ५ ते १६ फुट उंचीच्या या मूर्ती आहेत. राज्य शासनाने गणेश मूर्तीच्या उंचीच्या नियमात सुधारणा करून तयार गणेश मूर्ती बसवण्यास मंडळांना परवानगी द्यावी असे निवेदन कोल्हापूरतील सर्व कुंभार समाजाकडून स्थानिक लोकप्रतिनिधींना सादर करण्यात आले आहे.