आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:एकटे संभाजीराजे काय करणार, सर्व 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी- छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'राज्य सरकारबरोबर चर्चेचा निर्णय उद्या घेऊ'

मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मोठ्या मोर्चाचे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाला सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या मोर्चावेळी विविध नेत्यांनी आपले मत मांडले. दरम्यान, यावेळी संभाजीराजे छत्रपती यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनीही उपस्थितांना संबोधित केले. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. समाजाने हा विषय दिल्लीपर्यंत ठामपणे नेला पाहिजे. संभाजीराजे काही ना काही करत राहतील, पण एकावर जबाबदारी शक्य नाही. सर्व 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी असे मत यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, मला उपमुख्यमंत्री अजित पवार भेटून गेले. त्यांनी समाजाच्या मागण्यांना मान्यता दिली आहे. घटनेत आतापर्यंत अनेक अमेण्टमेंट झाल्या. आता अजून एक करायला काय हरकत आहे ?, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. तसेच, पंतप्रधानांसमोर आणखी एकदा हा विषय गेला पाहिजे. पंतप्रधानाचे विचार काय ते स्पष्ट झाले नाहीत, त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने चर्चेत आमंत्रण दिले असले तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडचे नियोजित आंदोलन होणारच आहे. राज्य सरकारबरोबर चर्चेचा निर्णय उद्या घेऊ. सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यास नाशिकचे आंदोलन विजयोत्सव म्हणून करू. तसेच, तत्कालिन पारिस्थितीवरून शाहू महाराजांनी आरक्षण दिले. आपण कमजोर आहोत असे समजू नका. आपण बलाढ्य आहोत हे दिल्लीपर्यंत गेलं पाहिजे, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...