आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केतकी चितळेचे समर्थन:फडणवीसांना पदव्या दिल्या, तेव्हा नैतिकता कुठ गेली?  सदाभाऊ खोतांचा सवाल, नंतर सारवासारव

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही देवेंद्र फडणवीस, त्यांची धर्मपत्नी, चंद्रकांत पाटील यांना काय काय पदव्या दिल्या होत्या, तेव्हा कुठे गेली होती नैतिकता? ज्या वेळी आपल्यावर वेळ येते तेव्हा नैतिकता आठवते? केतकी चितळे कणखर आहे. तिने न्यायालयात स्वतः युक्तिवाद केला आहे. तिला समर्थनासाठी कुणाची गरज नाही, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्या केतकी चितळेचे समर्थन केले.

यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.तुळजाभवानी मंदिर कार्यालयात सोमवारी (दि.१६) सकाळी पत्रकारांशी खोत बोलत होते. खोत म्हणाले, पोलिस स्टेशनमध्ये तिच्यावर हल्ला होतो. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे का, सरकार पुरस्कृत दहशतवाद तुम्ही वाढवत आहात का, तुमचे विधान परिषदेतील आ. अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात, खालच्या पातळीवर टीका करतात तेव्हा कुठे गेली होती नैतिकता?

बातम्या आणखी आहेत...