आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सत्ताकारण:ज्यांच्यामुळे ‘नाराजी’ त्यांनीच राजू शेट्टींना आमदारकीसाठी केले ‘राजी’

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीच्या ऑफरमुळे निर्माण झालेले हे वादळ अखेर पेल्यातील वादळच ठरले
Advertisement
Advertisement

पक्षातील इतर नेत्याला आमदारकी द्यावी, असा आग्रह धरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांना नाराज करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीच पुन्हा गळ घालून शेट्टी यांना ‌विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राजी केले.

स्वाभिमानी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी रात्री बैठक झाली. या वेळी शेट्टींना विरोध करणारे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील व राजकीय व्यवहार समिती प्रमुख सावकार मदनाईक यांनीच पुन्हा शेट्टींना राज्यपाल नियुक्त आमदारकी स्वीकारण्याची गळ घातली. पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतर शेट्टींनी त्यास संमती दर्शवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ऑफरमुळे निर्माण झालेले हे वादळ अखेर पेल्यातील वादळच ठरले. राजू शेट्टींनी शरद पवारांची बारामतीत भेट घेत विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारली होती. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेत फूट पडली होती. जालिंदर पाटील व सावकार मदनाईक यांनी शेट्टी यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला होता. 

राष्ट्रवादीने ही जागा स्वाभिमानीला देऊ केलेली असताना शेट्टी यांनी पक्षातील अन्य नेत्याचा विचार करणे गरजेचे होते. पवारांच्या विचाराला विरोध करणाऱ्या नेत्याने आमदारकीसाठी राष्ट्रवादीच्या पायाशी लोळण घेऊ नये, असा टोला लगावला होता.

Advertisement
0