आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:पोकलॅंडमध्ये सापडल्याने कचरावेचक महिलेचे शीर झाले धडावेगळे,कोल्हापूरातील झूम प्रकल्पावरील प्रकार

कोल्हापूर9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कचऱ्याचे विलगीकरण करताना पोकलॅंडच्या बकेटचा दात मानेत घुसून कचरा वेचक महिलेचे शीर धडावेगळे झाल्याची घटना रविवारी सकाळी कोल्हापूरात कसबा बावडा येथील झुम प्रकल्पावर घडली. या घटनेमुळे प्रकल्पावर एकच खळबळ माजली. घटनास्थळी महिलेचे धड मिळाले, पण शीर तुटून बकेटमधून कचऱ्याबरोबर ढिगाऱ्यात गायब झाल्याने सुमारे तीन तासाच्या शोधमोहीमेनंतर ते कचर्यातच सापडले. मंगल राजेंद्र दावणे (वय ६० रा. तिरंगा चौक, आठ नंबर शाळेनजीक, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पोकलॅंडवरील दोघा चालकांना ताब्यात घेतले आहे.

कसबा बावडा येथील झुम कचरा प्रकल्पावर संपूर्ण शहरातील कचरा टाकला जातो. रविवारी सकाळी इतर महिला मोठ्या ढिगार्यानजीक कचऱ्यात स्क्रॅप शोधत होत्या, त्याचवेळी डंपीग ग्राऊंडच्या ठिकाणी पोकलॅंडद्वारे कचरा हालवताना कचर्याच्या ढिगांमागे खड्ड्यात मंगल दावणे ह्या स्क्रॅप शोधत होत्या. पोकलॅंन चालकाला ढिगार्यामागे काही न दिसल्याने त्याने नेहमीप्रमाणे कचरा उचलला, त्याचवेळी बकेटचे दात स्क्रॅप शोधणाऱ्या त्या महिलेच्या मानेत घुसून त्याचे शीर धडावेगळे झाले.धड कचऱ्याच्या खड्ड्यात राहीले तर शीर कचऱ्यासह उचलू न इतर ढिगाऱ्यात टाकले. काहीवेळाने कचरा उचलताना बकेटवर महिलेचे धड दिसल्याने हा प्रकार चालकाच्या लक्षात आला. त्यानंतर तीन तास कचर्यात शोधकाम केल्यानंतर कचर्याच्या खड्ड्यात हरवलेले महिलेचे शीर सापडले.शीर मिळाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आला. शाहूपुरी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...