आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अपघातात 10 वर्षांच्या मुलासह महिला ठार

सातारा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळूमामांच्या मेंढरांचे दर्शन घेऊन पुण्याकडे परत निघालेल्या भाविकांच्या कारने रस्त्याकडेला थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून धडक दिली. यात कारमधील महिलेसह १० वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला, तर ५ जण गंभीर जखमी झाले. सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथे हा अपघात झाला. अपघातग्रस्त पुणे व अकोला येथील रहिवासी आहेत. कांचन चंद्रकांत वनशिवे, वीरेंद्र चंद्रकांत वनशिवे (रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. संकेत चौधरी (रा. वडगाव रासाई, ता. शिरूर जि. पुणे), स्नेहल कुलते, अनिल कुलते, अंजली कुलते, परी कुलते (सर्व रा. अकोला) हे गंभीर जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...