आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:महिलांनीच पुढे होऊन संघर्ष पुकारायला हवा - सुधा सुंदररामन

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आत्ताचे केंद्रातील सरकार सर्वांनाच मूर्खात काढत आहे. यामुळेच या देशात महिलांनीच आता पुढे होऊन संघर्ष पुकारायला हवा. आगामी निवडणुकीतून केंद्रातील भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ द्यायचे नाही, असा निर्धार महिलांनी करावा, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा कॉ. सुधा सुंदररामन यांनी केले आहे.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे बारावे महाराष्ट्र राज्य अधिवेशन सातारा येथील वेदभवन मंगल कार्यालयातील कमल वानलेनगरात शुक्रवारपासून सुरू झाले. उद्घाटक म्हणून सुंदरामन बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्षा कॉ. नसीमा शेख होत्या. भाजपचा भाईचाऱ्याच्या संस्कृतीवर घाला : भाजपची प्रवृत्ती देशातील सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या, तसेच भाईचाऱ्याच्या संस्कृतीवर घाला घालणारी, हल्ला करणारी आहे. भाजपच्या अपप्रवृत्तीच्या विरोधात आपली विचारधारा आहे. सर्वांनी त्याला अधिक मजबूत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार वृंदा कारत यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...