आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:कोल्हापूरातील तालमीतून पुन्हा घुमू लागला शड्डूचा आवाज, कोरोनामुळे आठ महिने बंद होत्या तालमी

कोल्हापूर7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • शासन नियमावलीचे पालन करून सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात होणार सराव

कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरातील तालमी कोरोनामुळे गेले आठ महिने बंद होत्या. पैलवानांचा सरावही थांबला होता. महाराष्ट्रासह देशभरातून कुस्ती शिकण्यासाठी व सरावासाठी आलेले मल्ल आपापल्या गावी निघून गेले. पण आता कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाने तालीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तालमीतून पैलवानांच्या शड्डूचे आवाज घुमू लागले आहेत.

देशभरात लॉक डाऊन मुळे गेली 8 महीने बंद असणारे कुस्ती आखाडे शासनाच्या नियमानुसार आजपासून कुस्तीगिरांना सरावासाठी खुले झाले. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या व्यवस्थापनाखाली असणारी राजर्षि छत्रपती शाहू महाराजांची मोतीबाग तालीम आज शनिवार पहाटे 6 वाजता हनुमानाच्या मूर्तीचे पूजन करून शास्त्रोक्त पद्धतीने उध फुले घालुन आखाडा पूजन करून गेल्या आठ महिन्यापासून दबलेल्या तालमीतील तांबड्या मातीचे पैलवानाने उत्खनन करून जोर-बैठका ची मेहनत करत कुस्ती पकडीचा ही सराव केला. पैलवान साठी शासन नियमावलीचे पालन करून सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात मध्ये सराव घेतला जाणार आहे.

या शुभारंभास तालीम व्यवस्थापन समितीचे अशोक पोवार, निलेश देसाई, अशोक माने, वस्ताद पै उत्तम चव्हाण, पै रामा कोवाड, पै विजय पाटील, बाबुराव चव्हाण, वस्ताद दादू चौगुले, जुनियर कुस्ती कोच सुहेल इत्यादी प्रमुख कुस्तीगीर मल्ल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...