आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • 1 Lakh 60 Thousand Cases Filed Of Violation Of Rules In Lockdown In The Maharashtra , 29 Thousand People Arrested; A Fine Of Rs 11 Crore Was Recovered

लॉकडाउनमध्ये कारवाई:राज्यात लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 1 लाख 60 हजार गुन्हे दाखल, 29 हजार लोकांना अटक; 11 कोटींचा दंड वसूल केला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत लॉकडाउनदरम्यान विनाकारण बाहेर निघालेल्या व्यक्तीची चौकशी करताना पोलिस
  • गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, आयपीसी कलम 188 अंतर्गत 1,61,821 गुन्हे दाखल झाले आहेत

राज्यात कोविड-19 बंद दरम्यान निषेधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त गुन्हे नोंदवण्यात आले आणि 29 हजारांपेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. 

11 कोटींचा दंड वसूल केला

दरम्यान या कालावधीत आरोपींकडून 11 कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड वसुल करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले तसेच लॉकडाउन लागू झाल्यानंतर आयपीसी कलम 188 अंतर्गत 1,61,821 गुन्ह्यांची नोंद झाली आणि याप्रकरणी 29,990 लोकांना अटक केली असल्याचे गृहमंत्री म्हणाले. 

आतापर्यंत 90 हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत

अनिल देशमुखांनी सांगितले की, लॉकडाउन उल्लंघन केल्याप्रकरणी 89,459 वाहने जप्त केली आणि अवैध वाहतुकीचे 1,335 गुन्हे नोंदवले गेले. पोलिस हेल्पलाईन 100 नंबर वर कोविड-19बाबतच्या कॉलमध्ये सतत वाढ झाली आहे, आतापर्यंत अशा प्रकारचे 1 लाखाहून अधिक कॉल आल्याचे मंत्री म्हणाले. 

305 पोलिसांवरही हल्ले झाले

राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांवर 350 हल्ले झाले. याप्रकरणी 867 लोकांना अटक करण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. 

0