आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा 10 दिवस आंदोलनाचा धडाका, उद्या गुरुवारी सर्व विभागीय आयुक्त मुख्यालयी सायकल यात्रा - नाना पटोले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर येथे आंदोलनात सहभागी होणार

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असून गुरुवार दिनांक ८ जुलैपासून दहा दिवस विविध आंदोलनाच्या रुपाने मोदी सरकारच्या विरोधात एल्गार करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरिब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता ८५० रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल ३० रुपये लिटर व डिझेल २२ रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी १०० रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करुन ठेवले असून त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून या जुलमी, अत्याचारी सरकारचा निषेध करणार आहे.

महागाई विरोधातील या आंदोलनात उद्या गुरुवारी स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नागपूरमध्ये मंत्री नितीन राऊत सुनील केदार यांच्यासह सायकल यात्रा काढणार आहेत. तर राज्यातील सर्व विभागीय आयुक्तालयामध्ये काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटलचे व सेलचे पदाधिकारी विविध आंदोलनात सहभागी होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...