आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० लाख ५६ हजार मतदार कमी झाले आहेत. तर, दिव्यांग मतदारांत १५ हजारांनी वाढ झाली आहे. दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे, मृत्यूमुखी पडलेले व छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याबाबत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता, त्याअंतर्गत १० लाख मतदार कमी झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी (ता.५) दिली.
देशपांडे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने ऑगस्ट २२ ते नोव्हेंबर २२ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता. यात मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण, दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे, मृत्यूमुखी पडलेल्या मतदारांची नावे वगळणे तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो घेऊन ते सुधारित करण्याचे काम करण्यात आले. सोबतच १८ वर्षे पूर्ण केलेले युवा मतदार, दिव्यांग, महिला, देहविक्री करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय व्यक्ती, दुर्गम व आदिवासी भागातील व विमुक्त भटक्या जमातीतील व्यक्तींची नोंदणीही करण्यात आली. राज्यात गेल्या वर्षी जानेवारीत ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. मात्र, दुबार, छायाचित्र नसलेले व मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची संख्या ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ इतकी झाली आहे. त्यामुळे १० लाख ५६ हजार इतके मतदार गेल्या वर्षीपेक्षा कमी झाले आहेत, असेही त्यांनी बोलताना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.