आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • 100 Crore Case | Anil Deshmukh | Marathi News | Chief Minister Uddhav Aditya's Instructions To Re employ Waze; Former Commissioner Of Police Parambir Singh's Claim To ED

कलाटणी:वाझेला पुन्हा कामावर घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव-आदित्य यांचे निर्देश; माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांचा ईडीकडे दावा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर दबाव टाकला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरूनच वाझेला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला आहे. सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात हा दावा केला आहे. परमबीर यांच्या जबाबामुळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणी ईडीने जानेवारी महिन्यात पुरवणी आरोपपत्र दाखल केलेले आहे. त्यामध्ये परमबीरसिंग यांनी हा दावा केलेला आहे. वाझेला पुन्हा पोलिस सेवेत सामावून घेण्यासाठी आपल्यावर थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा थेट दबाव होता. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडूनही सूचना करण्यात आल्या होत्या,’ असे परमबीर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

तुरुंगात वाझेचा छळ होतोय
वाझेचा तुरुंगात छळ केला जात आहे. त्याचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी दररोज शिव्याशाप, अंगझडती घेतली जाते. ठाणे येथील एका पोलिस उपायुक्त वाझेला भेटण्यासाठी तुरुंगात गेला होता. त्यानेही त्याच्यावर दबाव टाकला, असाही दावा परमबीर यांनी केला आहे.

जबाब बदलण्यासाठी वाझेवर देशमुखांचा दबाव
सचिन वाझेने सक्तवसुली संचालनालयासमोर दिलेला जबाब मागे घ्यावा यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला, असाही आरोप परमबीर यांनी केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल यांच्या एकसदस्यीय आयोगासमोरील सुनावणीवेळी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी देशमुख आणि वाझे यांची भेट झाली होती. त्या वेळी वाझेवर जबाब मागे घेण्यासाठी देशमुख यांनी दडपण आणले, असे परमबीर यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

परमबीर हेच अँटिलिया स्फोटके-हिरेन हत्येचे मास्टरमाइंड : अनिल देशमुख
मुंबई | परमबीरसिंग हेच मुकेश अंबानी यांचे निवास अँटिलियासमोरील स्फोटके आणि ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेनच्या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या पुरवणी आरोपपत्रातील जबाबात त्यांनी हा दावा केला आहे. माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेला आपण ओळखत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुखांनी नियुक्तीसाठी वाझेकडे मागितले २ कोटी रुपये

1. सचिन वाझेला जून २०२० मध्ये आढावा बैठक झाल्यानंतर पुन्हा नियुक्त करण्यात आले होते. काही सहआयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी सदस्य असलेल्या मुंबई पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने आढावा घेतला होता. सर्व निलंबित प्रकरणांचा ही समिती आढावा घेत असते.

2. सचिन वाझे याला पुन्हा पाेलिस दलात घेण्याची कारणे आढावा समितीच्या फाइलमध्ये आहेत. मात्र वाझेला पुन्हा पोलिस सेवेत घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा थेट दबाव होता. तसेच मला आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात निर्देश दिले होते.

3. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत वाझेची नियुक्ती करण्याची तसेच महत्त्वाच्या युनिटची जबाबदारी त्याच्याकडे देण्याची सूचनाही मला देण्यात आली होती. सचिन वाझेच्या नेतृत्वाखालील गुन्हे गुप्तवार्ता विभागाकडे काही महत्त्वाची प्रकरणे सोपवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी (देशमुख) दिल्या होत्या.

4. सचिन वाझेला पुढील कारवाई आणि सूचना देण्यासंदर्भात दोघांकडून (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख) थेट बोलावले जायचे. यालाच जोडून मी हे सांगू इच्छितो की, पुन्हा सेवेत घेण्यासाठी आणि नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी सचिन वाझेकडे २ कोटी मागितले होते. हे वाझेनेच मला (परमबीर) हे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...