आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई महापालिकेच्या ‘बेस्ट’ परिवहन विभागात एक हजार कर्मचाऱ्यांचे पगार न देऊन आणि त्यांचा पीएफ न भरून फसवणूक करण्यात आली आहे, असा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 100 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बेस्ट प्रशासन, कंत्राटदार एमपी एंटरप्रायझेस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची कंपनी किश कॉर्पोरेट सर्व्हिसेसने संगनमताने सुमारे 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
बेस्टच्या एक हजार कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही आणि त्यांचा पीएफही जवळपास 12 महिन्यांपासून जमा झालेला नाही, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात मिनीबस चालवण्यासाठी बेस्टने एमपी एंटरप्रायझेसशी करार केला होता. नंतर कुलाबा, कुर्ला आणि वडाळा बस डेपोमधून बस चालवण्यासाठी एमपी एंटरप्रायझेसने किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, स्टार एंटरप्रायझेस आणि प्रथमेश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांशी बेकायदेशीर करार केला. या कंपन्यांनी बेस्टकडून कर्मचारी आणि चालकांचे पगार घेतले, मात्र ते दिले नाहीत. याशिवाय पीएफचे पैसे घेऊनही त्यांनी जमा केले नाही.
कुलाबा पोलिसांनी त्यांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित कंपन्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आश्वासन दिले आहे, असे सोमय्या यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.