आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 1495 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 25 हजार 922, बळींचा आकडा 975

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • पुणे, सांगली, सोलापुरातून 1 हजार 359 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, आज राज्यात  1495 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबच राज्यातील एकूण आकडा 25 हजार 922 वर पोहचला आहे. तसेच, आज 54 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण मृतांचा आकडा 975 झाला आहे. यात चांगली बाब म्हणजे, 422 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मंगळवारी राज्यात 1026 नवे रुग्ण तर 53 मृत्यूची नोंद झाली. मंगळवारी 339 रुग्ण बरे झाले. आजवर झालेल्या 2 लाख 31,061 चाचण्या झाल्या आहेत.

पुणे, सांगली, सोलापुरातून १ हजार ३५९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी 

पुणे विभागातील १ हजार ३५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ५३२ झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण १ हजार ९८६ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण १८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १२८ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील २७५ कोरोनाबाधित रुग्ण असून ४७  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या २१० आहे. कोरोनाबाधित एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील ३८ बाधित रुग्ण असून २८  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ९ आहे. कोरोनाबाधित एकूण १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १८ कोरोनाबाधित रुग्ण असून ९ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या ८ आहे. आजपर्यंत विभागामध्ये एकूण ३६ हजार २१८ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. २ हजार ६२६  नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

उपराजधानीत पॉझिटिव्ह रुग्णांचे झाले त्रिशतक

नागपूर जिल्ह्यातील करना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने मंगळवारी त्रिशतक गाठले. आणखी सहा रुग्णांची भर पडल्यावर जिल्ह्यात करना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३०४ वर पोहोचला आहे. गेल्या आठवडाभरापासून प्रामुख्याने नागपूर शहरातील करना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. सहा दिवसांतच आकडा  शंभरने वाढला. त मंगळवारी आणखी ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण रुग्ण संख्येने त्रिशतक गाठून आकडा ३०४ वर पोहोचला. आतापर्यंत नागपुरात करना संगामुळे चार जणांचा मृत्यू झाला. मात्र, त्याचवेळी ९६ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

सातारा जिल्ह्याचा आकडा पाेहोचला १२१वर

सातारा | सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे ठाणे येथून प्रवास करून आलेला एक २० वर्षीय युवक व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे निकट सहवासित म्हणून दाखल असणारा २९ वर्षीय पुरुष असे एकूण २ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या १२१ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे ९ व वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे १४२ जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...