आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:दहावीच्या भूगोलाच्या पेपरसह नववी आणि आकरावीच्या परीक्षाही रद्द, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याआधी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे
  • मुंबईत कोरोनामुळे इतर रुग्ण, नातेवाईक उड्डाणपुलाखाली

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीची राहिलेली भूगोल विषयाची परीक्षा  रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, इयत्ता नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा होणार नसल्याचेही  जाहीर केले आहे. नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थी-पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा  निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, ‘नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे पहिल्या सत्रातील चाचण्या, प्रात्यक्षिकांमधील गुण यानुसार त्यांचे अंतर्गत मूल्यमापन होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची शिल्लक राहिलेली भूगोल विषयाची परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. इयत्ता दहावीच्या कार्यशिक्षण विषयाच्या नऊ विविध विषयांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. घरगुती विद्युत उपकरणे, पाककला, भारतीय संगीत आदी विविध नऊ कार्यशिक्षण विषयांचा परीक्षा आधीच्या नियोजित वेळापत्रकानुसार २४ मार्च ते ४ एप्रिल २०२० रोजी होणार होत्या. या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या विषयांच्या परीक्षा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात. 

देशात सर्वात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढला आहे. याचा विचार करुन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. 21 मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र 23 मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर रद्द झाला होता. यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. याआधी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे

अमरावतीमध्ये प्रवासी व्हिसावर वास्तव्य; १८ परदेशी नागरिकांविरोधात गुन्हे  

अमरावती : पाच महिलांसह १८ परदेशी नागरिकांना अमरावती शहरात संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.  गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून या नागरिकांचे साबनपुरा परिसरात वास्तव्य होते. त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या सर्व १८ नागरिकांविरोधात खोलापुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हे परदेशी नागरिक म्यानमार, दक्षिण आफ्रिकेसह विविध देशातील आहेत.  या अठरा जणांकडे प्रवासी व्हिसा असल्याचे पोलिसांंनी सांगितले. या सर्वांना शहरातील एका इमारतीत क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. 


मालेगाव  येथे बाधितांच्या संपर्कात आल्याने २४ तासांत १८ रुग्ण वाढ
ले 

नाशिक : शनिवारी मध्यरात्री मालेगावच्या  पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा नव्याने १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.त्यामुळे  गेल्या २४ तासांमध्ये १८ रुग्ण वाढले आहेत. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण ३२ वर गेली असून त्यात मालेगावमधीलच एका मृत व्यक्तीचा समावेश आहे. विशेष म्हणजे नव्याने आढळलेले १३ रुग्ण हे यापूर्वीच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच कुटुंबातील असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.   

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर

देशातील सर्वात जास्त कोरोना प्रभावित राज्य महाराष्ट्र बनले आहे. राज्यात आतापर्यंत 1 हजार 895 प्रकरणे समोर आली आहे तर 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संक्रमितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दक्षिण मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेसमधील सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ताज हॉटेलचे संचलन करणारी इंडियन हॉटेल्स कंपनी (आयएचसी) ने कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची पुष्टी केली.

रविवारी राज्यात नवीन 148 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या 1895 झाली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाउन पार्ट-2 आता अजून कडक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. संक्रमितांची साखळी तोडण्यासाठी राज्याची तीन झोनमध्ये वाटणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...