आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत सतत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या दोन भूस्खलनांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 17 जणांचा चेंबूर भागात तर 5 जणांचा मृत्यू विक्रोळी येथे झाला. 16 लोकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाच घरे कोसळली आहेत. दोन घरांचा ढिगारा काढण्यात आला असून तीन घरांचा मलबा काढणे सुरु आहे. घटनास्थळी उपस्थित एनडीआरएफ टीमचे बचाव कार्य सुरू आहे. पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत.
मुंबई महानगर पालिकेच्या म्हणण्यानुसार, चेंबूर अपघात मृतांची संख्या वाढून 17 झाली आहे. तर दोन जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. झोन सातचे डीसीपी प्रशांत कदमने सांगितले की, या ढिगाऱ्यातून 5 मृतदेहांना बाहेर काढण्यात आले असून यामध्ये 5 ते 6 लोक अडकल्याची शक्यता आहे.
दोन ठिकाणी भूस्खलन
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, शनिवारी रात्री साडेबारा वाजता हा अपघात झाला, ढिगाऱ्याखाली लहान मुलेही अडकली होती. आम्ही जखमींना रिक्षातून रुग्णालयात पोहोचवले. रुग्णवाहिका येण्यास थोडा वेळ लागला.
अरुंद गल्लीमुळे बचाव करणे कठीण
चेंबूरमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथील गल्ल्या ह्या अरुंद आहेत. तर काही घरे उंचावर आहे. त्यामुळे तेथे पोहोचण्याकरीता एनडीआरफ टीम अवघड झाले होते. रुग्णवाहिकेलादेखील काही अंतरावर उभे करावे लागत आहे. सध्या या ठिकाणी मदत व बचावकार्य वेगाने सुरु आहे. मदतीसाठी काही स्थानिक लोकांचीदेखील मोठी मदत मिळत आहे.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर
या घटनेतील मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलिस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी जाहीर केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला शोक
मुंबईतील चेंबुर व विक्रोळी परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केले
या घटनेवर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केले आहे. या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने दु: खी झाल्याचे ते म्हणाले. मी शोकग्रस्त कुटुंबांबद्दल शोक व्यक्त करतो. मदत आणि बचाव कार्यात यश मिळावे अशी इच्छा रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले. ते म्हणाले की, काल मुंबईत 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे ही घटना नैसर्गिक आपत्ती असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील गृहनिर्माण संकट सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले जाणार - नवाब मलिक
मुंबई महानगर पालिका या घटनेची चौकशी करणार आहे. राज्य सरकार येथे राहणाऱ्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी तात्काळ हलविण्याचा निर्णय घेणार असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.