आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज जागतिक हिंदी दिन:दहा वर्षांत हिंदी सिनेमांच्या महसुलात 110% वाढ; मुंबईत 100 हून अधिक संस्था बॉलीवूडला देताहेत हिंदीचे धडे

मुंबई ( मनीषा भल्ला )3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलीवूडची कमाई हिंदीतून, मात्र कामकाज होते इंग्रजीमधून

भारतीय चित्रपटसृष्टीत बॉलीवूड सर्वात वेगाने वाढलेली इंडस्ट्री आहे. बॉलीवूड १०% वेगाने वाढत आहे. हिंदी चित्रपटांच्या भारताबाहेरील व्यवसायातही २७◘% वेगाने वाढ होत आहे. २००९ मध्ये सर्व भाषांमधील चित्रपटांतून मिळणाऱ्या महसुलात बॉलीवूडचा हिस्सा १९% होता, जो आता वाढून तब्बल ४० टक्क्यांवर आला आहे. यात तब्बल ११०% वाढ झाली आहे. यावरून हिंदीचे प्रभुत्व लक्षात येते. दुसरीकडे, बॉलीवूडची सर्व कमाई हिंदीतून होते, मात्र कामकाज इंग्रजीतून केले जाते. एवढेच नाही तर चित्रपटांची कथा लिहिणाऱ्या लेखकांनाही आजपर्यंत “स्टार’चा दर्जा मिळू शकलेला नाही.

‘आर्टिकल-१५’ या चित्रपटाचे सहायक लेखक गौरव सांगतात की, आधीपेक्षा आता स्थिती सुधारली आहे. मात्र हिंदी चित्रपटांच्या लेखकांना आजही श्रेय आणि योग्य मानधन दिले जात नाही. तुलसी कंटेंटचे को-पार्टनर चैतन्य हेगडे सांगतात की, सध्या चित्रपटाच्या एकूण बजेटच्या २ टक्के रक्कम ही लेखनावर खर्च केली जात आहे. मात्र हे प्रमाण ४ चार टक्के असायला हवे, अशी गौरव यांची मागणी आहे. दरम्यान, इंग्रजीचे प्रभुत्व असलेल्या या इंडस्ट्रीमध्ये हिंदी भाषा बोलणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. उदाहरणार्थ, सध्या मुंबईत १०० पेक्षा जास्त संस्था हिंदी भाषेचे धडे देत आहेत. संस्थांकडून हिंदीचे उच्चार शिकवले जातात. लिसा रे, जॅकलिन फर्नांडिस आणि स्कॉटिश इतिहासतज्ञ विलियम डालरेंप्लेसारख्या दिग्गजांना हिंदी शिकवलेल्या पल्लवी सिंह सांगतात, बॉलीवूडमध्ये उच्चभ्रू, इंग्रजी संस्कृतीतील व्यक्ती आहेत. मात्र हिंदी येत नसल्याने अभिनयातही अडचण येते. यामुळे या व्यक्ती हिंदी शिकतात. दुसरीकडे, २५ पेक्षा जास्त अभिनेत्यांना हिंदीचे धडे देणारे आनंद मिश्रा सांगतात, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना कामासाठी हिंदी शिकणे आवश्यक असते. इतर भागातून येणारेही योग्य उच्चारासाठी हिंदी शिकतात. तसेच हिंदी चित्रपटांमध्ये हिंदीचा किती उपयोग करायचा आहे हे निर्मात्यांवरही अवलंबून असते. ‘बिग बुल’ व ‘चेहरे’ चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित म्हणाले, संवाद रोमन इंग्रजीत लिहिले जात असले तरी त्याचा पाया हिंदीचा असतो. हिंदीकडे कधीही दुर्लक्ष करता येणार नाही. उलट आता तर अनेक निर्माते योग्य उच्चाराचा सराव करतात.

मीडिया व मनोरंजन क्षेत्रात २.४२ लाख कोटींची उलाढाल
फिक्कीनुसार, भारतात मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात वाढ होईल. २०१८ मध्ये १.८२ लाख कोटींची व्यावसायिक उलाढाल होती. २०२२ मध्ये हा आकडा २.४२ लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी दर्जेदार कंटेंटमुळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. २०१८ ला भारतात ओटीटीने १२०० तासांच्या अस्सल कंटेंटची निर्मिती केली. २०१९ मध्ये हे प्रमाण १६०० तासांवर पोहोचले. कोरोना काळात ५८ % लोकांनी एंटरटेन्मेंट अॅप्स पाहिले.

बातम्या आणखी आहेत...