आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो:11,700 पानी आरोपपत्रात रियावर ड्रग्जची खरेदी, पैसे पुरवल्याचा आराेप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबी : अभिनेता सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात 33 जणांची नावे

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज अँगलचा तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शुक्रवारी ११,७०० पानी आराेपपत्र एनडीपीएस काेर्टात दाखल केले. त्यात सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शाैविक चक्रवर्तीसह ३३ जणांची नावे आहेत. ५ आरोपींना फरार दाखवले आहे. आराेपपत्रात रिया चक्रवर्तीवर ड्रग्जची खरेदी आणि पैसे पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जप्त केलेले ड्रग्ज, गोळा केलेले सर्व पुरावे व आतापर्यंतच्या तपासाशी निगडित दस्तऐवजांचा आराेपपत्रात समावेश आहे. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. आराेपपत्रात ड्रग्ज खरेदी आणि आर्थिक व्यवहारात रियाची प्रमुख भूमिका असल्याचे म्हटले आहे. त्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचेही जबाब समाविष्ट आहेत. आराेपपत्रात ५० हजार पानी डिजिटल साक्षी जोडल्या आहेत. त्यात आराेपींतील व्हॉट्सअॅप चॅट, फाेन काॅल डेटा रेकाॅर्ड आणि बँक दस्तऐवजासह इतर पुराव्यांचा समावेश आहे. तसेच २०० साक्षीदारांचे जबाबही आहेत. एनसीबी पूरक आराेपपत्रही दाखल करण्याची शक्यता आहे.

एनसीबीने केली होती ३३ जणांना अटक
प्रदीर्घ चौकशीनंतर एनसीबीने रिया चक्रवर्ती, शाैविक, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांच्यासह अनेक ड्रग्ज पेडलर्सना अटक केली होती. अभिनेत्री दीपिका पदुकाेण, सारा अली खान, श्रद्धा कपूरसह अनेकांची चौकशीही करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...