आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्वाची बातमी:राज्यात 11 वी सीईटीची परीक्षा जाहीर, 21 ऑगस्ट रोजी होणार परीक्षा; शिक्षण विभागाने जाहीर केली तारीख

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण राज्यात एकाचवेळी होणार परीक्षा.

दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटीची तारीख केंव्हा जाहीर होते याकडे लागले होते. कारण शिक्षण विभागाने यावर्षीपासून 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी परीक्षा जाहीर केली आहे. शिक्षण विभागाने याची तारीख जाहीर केली असून 21 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

संपूर्ण राज्यात एकाचवेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ही परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 6 दिवसांचा अवधी दिला जाणार आहे. उद्या 20 जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. शेवटची तारीख 26 जुलै 2021 ही आहे.

अशी होईल परीक्षा

  • ही परीक्षा 100 गुणांची असणार आहे.
  • सर्व प्रश्न बहुपर्यायी पद्धतीने विचारले जातील.
  • ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
  • परीक्षेसाठी दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे.
  • संपूर्ण राज्यात एकाचवेळी होणार परीक्षा.
बातम्या आणखी आहेत...