आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या कामांची चौकशी सुरू

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिकेच्या सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या कामांची कॅगच्या पथकाने चौकशी सुरू केली आहे. कॅगची टीम तपासासाठी आली असून ही नियमित प्रक्रिया असल्याचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून त्यांना कॅगच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. ऑगस्ट २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुंबई महापालिकेच्या कामांची कॅग चौकशी करण्याची घोषणा केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ ऑक्टोबर रोजी कॅगमार्फत चौकशी आदेश जारी केले. मुंबई महापालिकेच्या दहा विभागांनी २८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत केलेल्या सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा हिशेब कॅगच्या तपास पथकाने मागवला आहे.

डिसेंबरपर्यंत तपास पूर्ण करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कॅगच्या पथकाला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. कॅग टीमला डिसेंबर महिन्यापर्यंत तपास पूर्ण करायचा आहे, असे सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिकेतील ज्या विभागांच्या कामांची चौकशी केली जात आहे, तेथील अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत तपासात सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...