आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत बैठक:नक्षलग्रस्त भागात उभारणार शाळा, पोलिस चौक्या अन् मोबाइल टॉवर्स, विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांची 1200 कोटींची मागणी

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा, उद्धव ठाकरे, शिवराजसिंंह चौहान आणि नवीन पटनायक, चंद्रशेखर राव यांनी एकत्रित जेवण केले. - Divya Marathi
बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा, उद्धव ठाकरे, शिवराजसिंंह चौहान आणि नवीन पटनायक, चंद्रशेखर राव यांनी एकत्रित जेवण केले.

नक्षलग्रस्त भागांमध्ये पोलिस चौक्या, शाळा, मोबाइल टॉवर उभारण्यात येणार असून त्यासह विकासकामांसाठी केंद्र सरकारने १२०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची रविवारी दिल्लीत विज्ञान भवन येथे बैठक पार पडली. बैठकीस ठाकरेंव्यतिरिक्त नवीन पटनायक (अोडिशा), के. चंद्रशेखर राव (तेलंगण), नितीशकुमार (बिहार), शिवराजसिंह चाैहान (मध्य प्रदेश) आणि हेमंत सोरेन (झारखंड) हे उपस्थित होते.

नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नव्या धोरणावर चर्चा करण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी व्यक्त केली. बैठक दोन टप्प्यांत झाली. नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रभावी कारवाई करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच राज्यांनी नक्षलवादविरोधी अभियानाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली. दुसऱ्या टप्प्यात विकास योजनांची कशा प्रकारे अंमलबजावणी सुरू आहे, यावर चर्चा झाली. देशभरात ४५ जिल्ह्यांमध्ये माओवादी नक्षलवाद्यांचा उपद्रव आहे. सन २०१५ ते २० या पाच वर्षांच्या कालावधीत १००० नागरिक आणि ३८० जवान नक्षलवादाचेे बळी ठरले आहेत. ९०० नक्षली चकमकीत ठार झाले आहेत,अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली.

कॉलेज कॅम्पसमध्येही शहरी नक्षली : फडणवीस
विदर्भातील नक्षवाद्यांच्या कारवाया बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत. छत्तीसगड, तेलंगण आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांनी एकत्र येऊन नलक्षवाद्यांविरोधात मोहीम उघडली पाहिजे. शहरी नक्षलवाद्यांचा धोका वाढणार असून कॉलेज कॅम्पसमध्ये काही संघटना सक्रिय आहेत. त्यांचा बीमोड करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलायला हवीत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

गृहमंत्री अमित शहा-मुख्यमंत्री दोन वर्षांनंतर प्रथमच भेट
- बैठकीनंतर अमित शहा यांनी उद्धव ठाकरे, नितीशकुमार आणि शिवराजसिंह चौहान यांच्यासह स्नेहभोजन घेतले. ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता होती, परंतु दुपारी २ च्या विमानाने ते थेट मुंबईला परतले.
- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला होता. त्यांनतर मुख्यमंत्री ठाकरे हे शहा यांना रविवारी प्रथमच भेटले. या बैठकीनंतर दोघांमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शहा-ठाकरे स्वतंत्र बैठक झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...