आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्लोबर क्रिकेट’ मध्ये दबदबा वाढला:जगातील 3 नव्या क्रिकेट लीगमध्ये 13 संघ आयपीएल फ्रँचायझींचेच

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील दुसरी महागडी स्पोर्ट््स लीग आयपीएल आता आणखी इतर देशांच्या क्रिकेट लीगमध्येही दबदबा वाढवू लागली आहे. गेल्या वर्षी आयपीएल फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिकेत नवीन टी-२० लीग एसए-२० चे सर्व सहा संघ खरेदी केले होते. संयुक्त अरब अमिरातच्या इंटरनॅशनल लीगच्या एकूण ६ पैकी तीन संघ व जुलैमध्ये सुरू होणाऱ्या अमेरिकेच्या मेजर क्रिकेट लीगच्या सहापैकी ४ संघांवरही आयपीएल फ्रँचायझीचा मालकी हक्क आहे. म्हणजेच तीन देशांतील तीन नवीन क्रिकेट लीगच्या १८ पैकी १३ संघ आयपीएल फ्रँचायझीकडे आहेत.

क्रीडा विश्लेषक अॅडव्हांटेजचे डेन वेस्टन म्हणाले, फ्रँचायझी नवीन परदेशी संघांतील तरुण खेळाडूंना प्रशिक्षण व अनुभव देतून मुख्य संघासाठी तयार करत आहेत. उदाहरणार्थ मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकन गोलंदाज ड्वेन जॉन्सनला आपल्या केपटाऊन संघासाठी खरेदी केले होते. नंतर त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून त्यास मुंबईला आणले. अशाच प्रकारे सनरायझर्स हैदराबादने अॅडन मार्करमला आयपीएल २३ च्या कर्णधारपदाच्या आधी एसए-२० लीगमध्ये कर्णधार म्हणून आजमावलेले होते.

आयपीएलच्या हंगामात ७४ सामने असतातच, परंतु सर्वात महागड्या एनएफएलचे वर्षभरात २७२ सामने खेळवले जातात. संपूर्ण वर्षभर जगभरात कुठे ना कुठे टी-२० लीग सुरू राहावी, असे आयपीएल फ्रँचायझीला वाटते. आयपीएल फ्रँचायझीने किमान दाेन संघांसाठी प्रत्येकी २०० कोटी रुपये खर्च केले. मुंबई इंडियन्सचे मालक रिलायन्सकडे चार खंडांतील पाच संघ आहेत.

....पण क्रिकेट खासगीकरणामुळे आंतरराष्ट्रीय करिअरला आेहोटी पूर्वी भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह क्रिकेट खेळणाऱ्या सर्वात मोठ्या देशांत अंतर्गत स्पर्धा, राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी एक यंत्रणा होती. परंतु आता आयपीएल संघमालक परदेशी खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या तुलनेत अनेक पटीने जास्त पैसा देऊ लागले आहेत. त्यामुळे खेळाडू आंतरराष्ट्रीय करिअर सोडून फ्रँचायझीचा भाग बनत आहेत. न्यूझीलंडचे ३३ वर्षीय गोलंदाज ट्रेंट बोल्टही यापैकीच एक आहेत.