आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण स्फोट:धारावी परिसरात सिलिंडरचा भीषण स्फोट; दुर्घटनेत 14 जण जखमी, जखमींवर सायन रुग्णालयात उपचार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील धारावी येथे रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. धारावी परिसरात सिलेंडरच्या स्फोटात 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी रविवारी शाहू नगर परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 पैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. यापैकी दोघांना ५०-६० टक्के भाजले आहे.

गॅस गळती झाल्यामुळं घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. सिलेंडरमधून गॅसची गळती होत असल्यामुळं सिलेंडर घराबाहेर ठेवण्यात आला होता, अशी प्राथमिक आहे.

बातम्या आणखी आहेत...