आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:15 कोटी मागितल्या प्रकरणी परमबीरसिंगवर गुन्हा दाखल; बिल्डरचा आरोप : गुन्हे मागे घेण्यासाठी मध्यस्थामार्फत पैसे मागितले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका बिल्डरने केलेल्या तक्रारीवरून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात इतर पाच पोलिस अधिकारी आणि दोन सामान्य नागरिकांनाही आरोपी करण्यात आले आहे.

दक्षिण मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे. त्यात परमबीर यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण, निरीक्षक श्रीकांत शिंदे, आशा कोरके, नंदकुमार गोपाले आणि संजय पाटील यांचीही नावे आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त बिल्डरचे सहकारी संजय पुनामिया आणि सुनील जैनही आरोपी आहेत. बिल्डरच्या तक्रारीनुसार, पुनामिया आणि जैन यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत कट रचला. बिल्डरच्या विरोधात नोंदले गेलेले गुन्हे मागे घेण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे १५ कोटी रुपये मागितले. बिल्डरने तक्रारीत परमबीर यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

परमबीरसिंग यांच्याकडे सरकारी निवासस्थानाचे २४ लाख थकीत
वृत्तांनुसार, परमबीरसिंग यांच्याकडे सरकारी निवासस्थानाचे २४ लाख रुपयेही थकीत आहेत. त्यावरही सरकार कारवाई करू शकते. ही थकबाकी मार्च २०१५ ते जुलै २०१८ यादरम्यानची असल्याचे सांगितले जाते. यादरम्यान परमबीर ठाण्याचे पोलिस आयुक्तपदावर नियुक्तीच्या आधी ते अतिरिक्त पोलिस महासंचालक, एसआरपीएफ या पदावर होते. तेव्हा त्यांना मुंबईच्या मलबार हिलवर बी. जी. खेर मार्गावरील नीलिमा अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट देण्यात आला होता. ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतरही परमबीरसिंग यांनी हा फ्लॅट सोडला नाही तसेच त्याचे भाडेही दिले नाही. ही रक्कम वाढून सुमारे ५४.१० लाख रुपये झाली. तथापि, त्यांनी त्यापैकी २९.४३ लाख रुपये भरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...