आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिप्टाे एक्स्चेंज एफटीएक्सचे मालक व सर्वाधिक श्रीमंत:तिसाव्या वर्षी 1.5 लाख कोटी संपत्ती, क्रिप्‍टो एक्स्चेंजचे, मालक 99 % संपत्ती दान करणार, पेंटहाऊसमध्ये मुक्काम

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅम बँकमॅन केवळ तीस वर्षांचे आहेत. जगातील सर्वात माेठ्या तिसऱ्या क्रिप्टाे एक्स्चेंज एफटीएक्सचे मालक व सर्वाधिक श्रीमंत क्रिप्टाे धनाढ्यांत त्यांचा समावेश होतो. त्यांची एकूण संपत्ती १.५४ लाख कोटी रुपयांहून जास्त आहे. त्यांच्या क्रिप्टाे एक्स्चेंजचे मूल्यही त्यांच्या संपत्तीहून दुप्पट म्हणजेच ३.४ लाख कोटी रुपये आहे. यावरून ते किती शाही जीवन जगत असतील, याचा अंदाज सहजपणे लावता येईल. अब्जाधीशांसारखे उंची बंगले, महागड्या गाड्या, महागडी घड्याळे घालत असावेत, आलिशान कारमधून प्रवास करत असतील, असा अंदाज असेल. परंतु सॅम यांना त्यात रस नाही. सॅम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसारखे जगतात. कॅज्युअल कपडे परिधान करतात. डेस्कजवळील बिनबॅगवर झाेपतात. गेमिंग चेअरवरच काम करतात. ते सामान्य कारमधून प्रवास करतात. दहा रूममेट असलेल्या खाेलीत त्यांचा मुक्काम असतो. प्रभावी परोपकाराच्या सिद्धांतावर सॅम यांचा विश्वास असून त्यानुसार वाटचाल करायची आहे. “मला माझ्याजवळ एवढी संपत्ती बाळगायची नाही. इतरांना जास्तीत जास्त मदत करता येईल, अशा कारणांचा शाेध घेतला पाहिजे,’ असे तत्त्वज्ञान त्यांनी महाविद्यालयात असताना शिकले होते. सॅमने २०१९ मध्ये क्रिप्टाे एक्स्चेंज तयार करून माेठी संपत्ती कमावली. परंतु त्यानंतरही सॅम यांचे विचार बदलले नाहीत. जास्तीत जास्त संपत्ती कमावणे आणि ती जास्तीत जास्त दान करणे असे सॅम यांचे ध्येय आहे. कमाईतील केवळ एक टक्का संपत्ती स्वत: जवळ ठेवण्याची सॅम यांची इच्छा आहे. त्यातून निश्चिंतपणे उर्वरित जीवन जगता येऊ शकेल. बाकी सर्व संपत्ती दान करायची इच्छा आहे. त्यावर फेरविचार करणार नाही, असे सॅम सांगतात.

युक्रेनमध्ये मदत : एक्स्चेंजने पाठवली, २ कोटींचे दान

महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर तीन वर्षे सॅम यांनी वाॅल स्ट्रीट जर्नलसाठी काम केले. तेव्हा त्यांनी वार्षिक वेतनापैकी निम्मी रक्कम पशुकल्याण कार्यक्रमासाठी दिली होती. सध्या सॅम झूम काॅलवर व्हिडिआे गेम्स खेळतात. मित्रांसाेबतच राहतात. फेब्रुवारीत रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्यांनी क्रिप्टाे एक्स्चेंजने त्यांच्या युक्रेनमधील युजरला काही रक्कम दिली होती. सॅमने स्वत:चे २ कोटी रुपये युक्रेनच्या पीडितांना दिले होते.

बातम्या आणखी आहेत...