आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र काेरोना:सलग दुसऱ्या दिवशी 15 हजार काेराेना रुग्ण; 5 दिवसांत 59,395 नवे रुग्ण, शनिवारी 88 मृत्यू

मुंबई/नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रासह देशभरात काेरोना संसर्ग चिंताजनक पातळीने वाढत आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे. ९ मार्च ते १३ मार्चपर्यंतच्या पाचच दिवसांत तब्बल ५९,३९५ नवे रुग्ण वाढले आहेत. या काळात अॅक्टिव्ह रुग्णांतही २३,२०३ ने वाढ झाली आहे. एकूण मृतांचा आकडा २२५ ने वाढला.

शनिवारी १५,६०२ नव्या रुग्णांसह एकूण संख्या २२ लाख ९७,७९३ झाली. ८८ नव्या मृत्यूनंतर बळींचा आकडा ५२,८११ झाला. ७,४६७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची एकूण संख्या २१ लाख २५,२११ वर गेली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात २४,८८२ नवे रुग्ण आढळले. हा यंदाचा व गेल्या ८३ दिवसांतील उच्चांक आहे. एकट्या महाराष्ट्रातच ६३.५७% रुग्ण आढळले. मात्र शनिवारी लसीकरणाचाही नवा विक्रम झाला. दिवसभरात २० लाख ५३,५३७ जणांना डोस देण्यात आले.

सहकार्य करा, लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका : मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
मुंबई |गर्दी व नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे. कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी शनिवारी आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेंटर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची व्हीसीद्वारे बैठक घेतली. उद्धव म्हणाले, गतवर्षी झोपडपट्टीत संसर्ग दिसू लागला होता. या वेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. कुटुंबातील सदस्यांत एकदम फैलाव होत आहे.

औरंगाबाद ७२०, जालना ४००
शनिवारी मराठवाड्यात १५ जणांचा मृत्यू, तर २,१८१ रुग्ण आढळले. आैरंगाबादेत ७२० रुग्ण, तर ८ जणांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात प्रथमच एका दिवसात ४०० रुग्ण सापडले. बीड १८१, हिंगोली ६७, लातूर १२५, नांदेड ५९१, उस्मानाबाद ५४, परभणीत ४३ रुग्ण आढळले.

बातम्या आणखी आहेत...