आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमबाजी:16 वर्षीय रियाचा डबल गाेल्डन धमाका; 69 वर्षीय अशाेक पंडितचा सुवर्णवेध

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या १६ वर्षीय युवा नेमबाज रिया थत्ते आणि ६९ वर्षीय अर्जुन पुरस्कार विजेत्या अशाेक पंडितने शनिवारी ३७ वी महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धा गाजवली. या दाेघांनी आपल्या गटामध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. यादरम्यान रियाने एकाच दिवशी डबल गाेल्डन धमाका उडवला. तिने ज्युनियर आणि सीनियर गटामध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तिने २५ मीटर २५ मीटर स्पाेर्ट‌्स पिस्तूल प्रकारामध्ये दाेन सुवर्णपदके जिंकली. यातील ज्युनियर गटामध्ये नाशिकच्या सुहानी भाेसलेने राैप्यपदकाचा बहुमान पटकावला.

रियाची पदकांची हॅट‌्ट्रिक; गीताला सुवर्णपदक फाॅर्मात असलेल्या युवा नेमबाज रिया थत्तेने स्पर्धेत पदकांची हॅट‌्ट्रिक साजरी केली. याशिवाय तिने पदकांच्या चाैकारांचाही दावा मजबूत केला आहे. तिने शनिवारी ज्युनियर आणि सीनियरच्या २५ मीटर स्पाेर्ट‌्स पिस्तूल फायर आर्ममध्ये प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावले. तिने दाेन्ही गटाच्या फायनलमध्ये सर्वाधिक ५६७ गुणांची कमाई करत अव्वल स्थान गाठले. तसेच तिने शुक्रवारी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये राैप्यपदक जिंकले हाेते. तसेच औरंगाबादच्या गीता मस्केने सुवर्णपदक जिंकले. तिने शुक्रवारी सिनिअर गटातील महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला.

अशाेक पंडित चॅम्पियन : पुरुषांच्या २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारामध्ये ६९ वर्षीय अशाेक पंडित चॅम्पियन ठरले. या अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाजाने फायनलमध्ये ५६७ गुणांची कमाई करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. यादरम्यान त्यांनी फायनलमध्ये नाशिकच्या राकेश कदमला मागे टाकले. त्यामुळे राकेशला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. अशाेक पंडित यांचा स्पर्धेतील सहभाग आणि साेनेरी यश युवांसाठी प्रेरणादायी ठरले.

बातम्या आणखी आहेत...