आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • 1680 Crore Plan But The Work Of The Pipeline Will Be Completed Slowly, Minister Gulabrao Patil's Instructions, Mumbai Municipal Corporation Will Also Take Help.

औरंगाबादचा पाणीप्रश्न मंत्रालयात:1680 कोटींची योजना आली पण पाईपलाईनचे काम संथगतीनेच, कामे गतीने पुर्ण करण्याचे मंत्री गुलाबराव पाटलांचे निर्देश

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरासाठीच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम गतीने करून हा प्रकल्प त्वरित पूर्ण करावा असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्पासंदर्भात उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री श्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक झाली. शहरातील जुन्या पाणी पुरवठा योजनेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1680 कोटींची योजना मंजूर आहे. औरंगाबाद शहरासाठी हा पाणीपुरवठा प्रकल्प महत्वपूर्ण असून सर्व संबंधीत यंत्रणांनी या प्रकल्पाचे काम गतीने करून प्रकल्प त्वरित पूर्ण करावा.

योजनेच्या कामाला सुरुवात झाली असली तरी पाइपलाईनचे काम गतीने पूर्ण करण्याची गरज आहे. संबंधित यंत्रणांनी औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यकता असल्यास आपल्या स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे व उपलब्ध पाण्याचे योग्यपणे नियोजन करून ते सुव्यवस्थितपणे वितरीत करावे. संबंधित ठेकेदारांनी प्रकल्पाचे काम कालबद्ध रीतीने पूर्ण करावे. अन्यथा कडक कारवाई करण्याचे निर्देशही पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी दिले.

पाणी वितरण व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिकेची घेणार मदत

उद्योगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, औरंगाबाद शहरात नागरी सुविधांची अनेक दर्जेदार कामे झाली आहेत. शहरासाठी आवश्यक असणा-या या पाणीपुरवठा प्रकल्पाचे कामही वेगाने पूर्ण करून शहरवासीयांना दिलासा देण्यात यावा. औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थापनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकचेही सहकार्य घेण्यात यावे असे निर्देशही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. तसेच शहरातील पाणीप्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा विभागात काम केलेल्या निवृत्त तज्ज्ञ अधिका-यांचेही सहकार्य घेण्यात यावे.

या बैठकीला राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार संजय शिरसाट, प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, औरंगाबाद महापालिकेचे महानगरपालिकाआयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय तसेच संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...