आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • 19 Banglo Case | 19 Banglo Rashmi Thackeray In Alibagh | Marathi News | Shiv Sena Opposes Direct Visit To Korlai Village; CBI To Probe 'those' 19 Bungalows: Somaiya

19 बंगले प्रकरण:बांधकामाचे गुपित कोर्लई गावाला थेट भेट, शिवसेनेचा विरोध;‘त्या’ 19 बंगल्यांची सीबीआय चौकशी लावणार : सोमय्या

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते किरीट सोमय्या आपल्या लवाजम्यासह शुक्रवारी (ता.१८) अलिबागजवळील कोर्लई (जि. रायगड) गावात दुपारी पोहाेचले. या वेळी भाजप कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनीही ग्रामपंचायत कार्यालयासमोर तुफान गर्दी केली होती. त्यामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. गावातील रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले गायब असून त्याच्या सीबीआय चौकशीसाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार आहोत, असे किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

सोमय्या गावात येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोमय्या यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न झाला. सोमय्या हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाताच शिवसैनिकांनीही कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. सोमय्या पंचायत कार्यालयातून गेल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्या आले त्या जागेवर गोमूत्र आणि दूध शिंपडून जागेचे शुद्धीकरण केले. सोमय्या येताच शिवसैनिकांनी ‘निमका पत्ता कडवा है…’ ‘चले जाव, चले जाव, किरीट सोमय्या चले जाव’च्या घोषणा दिल्या. भाजप कार्यकर्त्यांनीही ‘किरीट सोमय्या आगे बढो’च्या घोषणा देत त्यांचे समर्थन केले. सोमय्या यांच्यासोबत भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरही होते. सोमय्या पाच मिनिटे ग्रामपंचायत कार्यालय होते. एक पत्र त्यांनी सरपंच प्रशांत मिसाळ यांना दिले. सोमय्यांनी कार्यालयात आमच्याशी एका शब्दानेही चर्चा केली नाही, अशी प्रतिक्रिया सरपंचांनी दिली.

सोमय्यांकडून माहिती अधिकाराचा वापर
काेर्लई गावात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी यांच्या नावे १९ बंगले उभारले होते. हे बंगले सध्या गायब आहेत. त्याचा तपास करण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीबीआय चौकशीची विनंती करणार आहोत, असे सोमय्या म्हणाले. कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ म्हणाले, किरीट सोमय्या यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली. त्यांना ती दिली. आज ते ग्रामपंचायत कार्यालयात आले, बसले आणि काही न बोलता पत्र देऊन गेले. आज फक्त त्यांना ड्रामाबाजी करायची होती. हा गावाला बदनाम करण्याचा डाव आहे. दिवंगत अन्वय नाईक यांनी घेतलेल्या जागेवर १८ बंगले होते. जमीन खरेदी केल्यानंतर अन्वय नाईक यांनी ती घरे पाडली. घरे पाडून रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी जमीन विकली. पूर्वी बंगले असल्याने ठाकरे व वायकर यांनी ग्रामपंचायतीकडे घरपट्टी भरली होती.

अन्वय नाईकांना सोमय्यांनी आत्महत्येस भाग पाडले : खा. राऊत
किरीट सोमय्या यांनी वास्तुविशारद अन्वय नाईक यांना दोनदा धमकावले. भाजपच्या लोकांनी त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केले. त्यामुळे अन्वय नाईक यांना आत्महत्या करावी लागली, असा खळबळजनक आरोप खा. संजय राऊत यांनी करत किरीट सोमय्या यांचा खेळ संपणार आहे. दोघे बाप-लेक जेलमध्ये जाणार आहेत, असा इशारा पुन्हा एकदा दिला.

भेटीदरम्यान भाजप-शिवसैनिक आमने-सामने

  • ठाकरे कुटुंबीयांचे कोर्लई गावालगत तब्बल १९ बंगले बांधून तयार असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. यामुळे प्रचंड राजकीय वाद पेटला होता.
  • सोमय्या गावात दाखल होताच शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले. ग्रामपंचायत कार्यालयात ते जाताच शिवसैनिकांनीही आत घुसण्याचा प्रयत्न केला.
  • पत्रकार अर्णब गोस्वामींकडे कोणत्याही कामाचे पैसे किंवा बिले मागायची नाहीत, अशी धमकी किरीट सोमय्या यांनी दिली होती, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...