आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:रश्मी ठाकरेंंचे 19 बंगले; सोमय्यांची पोलिसांत तक्रार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग (जि. रायगड) येथील १९ बंगल्यांचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी रेवदंडा पोलिस ठाण्यात रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यास ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, येत्या काही दिवसांत रेवदंडा पोलिस ठाण्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला जाईल. रश्मी ठाकरे यांनी १३ वर्षे या बंगल्यांसाठीची घरपट्टी भरली होती.

बातम्या आणखी आहेत...