आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट धाड:‘ईडी’ची बनावट धाड मारूनदोन कोटींचा एेवज लांबवला

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी करून एका टोळक्याने बनावट धाड मारत सोमवारी मुंबईच्या झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याकडून रोख २५ लाख व ३ किलो सोने असा एकूण १.९५ कोटी रुपयांचा ऐवज लांबवला. मुंबई पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. सोमवारी तीन जणांनी झवेरी बाजारातील एका बुलियन ट्रेडरच्या कार्यालयात फिल्मी स्टाइलमध्ये एंट्री करत मालकाविषयी चौकशी सुरू केली, कागदपत्रेही तपासली. तसेच काही कर्मचाऱ्यांनादेखील त्यांनी मारहाण केली. सुमारे २५ लाख रोकड आणि तब्बल ३ किलो सोने घेऊन हे टोळके पसार झाले.

मालक आल्यानंतर त्याने इतर व्यापारी आणि पोलिसांकडे चौकशी केली असताना ही बनावट धाड असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी मुंबईतून दोन जण तर रत्नागिरीमधून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. अाराेपींकडून तब्बल अडीच किलो सोने आणि १५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...