आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • 2 Good News For The State: For The First Time More Than 74 Thousand Patients Got Cured, The Country's First Oxygen Train Reached Its Destination With 'Pran Vayu'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासादायक दोन बातम्या:पहिल्यांदाच एका दिवसात 74 हजारांपेक्षा जास्त रुग्ण झाले बरे; विशाखापट्टनमहून ऑक्सीजनचे 7 टँकर घेऊन ट्रेन नाशकात पोहोचली

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राने मान्य केली टँकर विमानाने घेऊन जाण्याची मागणी

राज्यात महामारीच्या काळात दोन दिलासादायक बातम्या समोर आल्या आहेत. येथे पहिल्यांदाच एका दिवसात 74 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हा कोणत्याही राज्यात एका दिवसात बरे होणाऱ्यांचा सर्वात मोठा आकडा आहे. दुसरीकडे 20 एप्रिलला विशाखापट्टनमला गेलेली देशातील पहिली स्पेशल ट्रेन ऑक्सिजन घेऊन नागपुरातून शनिवारी सकाळी नाशकात पोहोचली. ट्रेनच्या माध्यमातून 7 लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) टँकरमधील तीन हे नागपूर आणि चार हे नाशकात उतरवण्यात आले. हे रस्ते मार्गाने राज्यातील वेगवेगळ्या शहरात पाठवण्यात आले.

ब्राझील-अमेरिकेपेक्षाही जास्त रुग्ण महाराष्ट्रात
महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान राज्यात सहाव्यांदा संक्रमित रुग्णांची संख्या 60 हजारांच्या पार गेली आहे. worldometers नुसार, अमेरिका आणि ब्राझीलला मागे सोडत महाराष्ट्र जगात पहिले असे राज्य बनले आहे, जिथे सर्वात जास्त कोरोना संक्रमित आढळत आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 66,836 नवीन पॉझिटिव्ह समोर आले. या दरम्यान 773 रुग्णांचा मृत्यूही झाला. हे मिळून राज्यात मृतांची संख्या वाढून 63,253 पर्यंत पोहोचली आहे.

केंद्राने मान्य केली टँकर विमानाने घेऊन जाण्याची मागणी
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑक्सीजनचे रिकामे टँकर इंडियन एअरफोर्सच्या विमानांनी दुसऱ्या राज्यांच्या ऑक्सिजन प्लांट्सपर्यंत पोहोचवण्यासाठी परवानगी मागितली होती. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याविषयी माहिती दिली आहे. टोपे यांनी सांगितले की, दुसऱ्या राज्यांमध्ये ऑक्सिजनचे रिकामे टँकर विमानाने पाठवले जातील. ऑक्सिजन भरल्यानंतर टँकर ट्रेन किंवा रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येतील.

दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी घ्यावे लागेल ई-पास
महाराष्ट्रा बाहेर किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी आता यात्रा पार घेणे आवश्यक असेल. महाराष्ट्र पोलिसांनी पहिले लॉकडाऊनचा नियम पुन्हा एकदा लागू केला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले की, राज्यात शुक्रवारपासून ई-पास सिस्टम लागू करण्यात आली आहे. पाससाठी लोकांना https://covid19.mhpolice.in वर अर्ज करावा लागेल. जे लोक ऑनलाइन अर्ज करु शकत नाही, ते जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मदत घेऊ शकतात. ई-पास आपत्कालिन स्थितीत वयक्तित वापरासाठी जारी केले जातील.

टेली-मेडिसिन आणि टेली-ICU सेवेवर जोर
दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी म्हटले होते की, कोरोना रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करण्यासाठी टेली-मेडिसिन आणि टेली-ICU सेवेवर जोर दिला जात आहे. त्यांनी म्हटले की, कोरोना विना लक्षण आणि सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन ठेवून डॉक्टरांच्या सल्ल्यावर त्यांच्यावर उपचार केले जात आहे. या कामात सेवानिवृत्त डॉक्टर आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे.

आर्थिक चक्र थांबू नये याकडे लक्ष
मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, पंतप्रधानांनी कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊनला अखेरचा पर्याय म्हणून वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र महाराष्ट्रात दुर्दैवाने कठोर नियम लागू करण्याची वेळ आली आहे. मात्र आर्थिक चक्र थांबू नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

बातम्या आणखी आहेत...