आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नौदलात कोरोना:आर्मीनंतर आता नौदलातही संक्रमण, आयएनएस आंग्रे तळावरील 21 नौसैनिक संक्रमित

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत नौदलाच्या तळावरील 21 नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाव्हायरसने भारतीय नैदलालाही आपल्या विळख्यात घेतले आहे. मुंबईत नौदलाच्या तळावरील 21 नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व नौसैनिकांना मुंबईतील कुलाबा स्थित नवडाळाच्या आयएनएसएच अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आर्मीनंतर नौदलात संक्रमणाचे हे पहिले प्रकरण आहे.

नौदलाने न्यूज एजन्सी एनआयला दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबई नौदल परिसरात 21 नौसैनिकांचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये आयएनएस आंग्रे तळावरील 20 नौसनिकांचा समावेश आहे. हे सर्व नौसैनिक आयएनएस आंग्रेच्या तळावर राहत होते. हे जहाज वेस्टर्न नेव्हल कमांडच्या नेव्हल ऑपरेशनला लॉजिस्टिक्स आणि एडमिनिस्ट्रेटिव मदत करते.

आयएनएस आंग्रे लॉकडाउन करण्यात आले

आयएनएस आंग्रे आता लॉकडाउन करण्यात आले आहे. सर्व रहिवासी ब्लॉक क्वारंटाईन करण्यात आले असून कंटेनमेंट झोन घोषित केले आहे. नौदलानेही हेसुद्धा स्पष्ट केले आहे की, शिप्स आणि सबमरीनवर कोणतीही संक्रमणाची केस समोर आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...